Quantcast
Channel: श्रध्दा-संस्कृती – Prahaar.in
Viewing all 1081 articles
Browse latest View live

आणखी काही प्रार्थना

$
0
0
namskar

हिंदू धर्मग्रंथात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक प्रार्थना दिसून येतात. प्रार्थना वेगवेगळ्या आणि अनेक प्रकारच्या देवतांच्या असल्या तरी शेवटी ईश्वर एकच असल्यामुळे त्या एकाच ईशतत्त्वात विलीन होतात. त्या संबंधीचा श्लोक पुढे दिला आहे.

namskarआकाशात पतितं तोय यथागच्छति सागरम्।
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ।।

ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पावसाचे पाणी नदी, ओढा अशा अनेक मार्गानी शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला मन:पूर्वक श्रद्धेने केलेला नमस्कार शेवटी केशवा (विष्णू) प्रति पोहोचतो.

गायत्री मंत्रच्या खालोखाल अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मंत्र म्हणजे महामृत्यूंजय मंत्र होय. या भावपूर्ण मंत्रजपाने शेवटी पार्थिवापासून बंधमुक्त होऊन जीव-शीव एकरूप होतात, असे शास्त्रवचन यात दिलं आहे. ही प्रार्थना पुढीलप्रमाणे-

ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिवबन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।

त्रिनेत्री भगवान (श्री शिवशंकर) स्वयं सुगंधी आहे आणि सर्व चराचराच्या शक्ती पुष्टीवर्धनाला कारण आहे, त्या (शिवाची) आम्ही प्रार्थना करतो की, जसे एक फळ पिकल्यानंतर (त्या) वेलीपासून आपोआप (गळून) बंधनमुक्त होते, तसे आम्हाला या (संसाररूपी वेलापासून) जन्म-मृत्यू बंधनापासून (शरीर पिकल्यानंतर)आपोआप मुक्त करून अमरत्व प्राप्त होऊ दे. (जीव-शीव एकरूप होऊन मोक्षाला प्राप्त होऊ दे.)


दारी रंगली रांगोळी..

$
0
0
rangoli

दिवाळी हा सण जसा दिव्यांचा असतो तसाच तो रंगांची मुक्त उधळण करणा-या रांगोळ्यांचादेखील असतो. मांगल्याचं प्रतीक मानली जाणारी रांगोळी अंगणात काढण्याची पद्धत पूर्वापार आहे. मात्र बदलत्या काळानुसार रांगोळीचं रुप बदलत गेलंय. पूर्वापार चालत आलेल्या रांगोळीच्या या विविध पर्यायांविषयी जाणून घेऊया.

rangoliअंगणात बसून कोरीव काम करून नक्षीदार रांगोळी काढण्यासाठी कोणाकडेही पुरेसा वेळ नसला तरी अद्यापही रांगोळीचं आकर्षण, महत्त्व आणि उत्साह टिकून आहे. घरापुढची अंगणं नाहीशी झाल्यामुळे मोठया पारंपरिक रांगोळ्यांची जागा आता अ‍ॅक्रेलिक किंवा रेडिमेड रांगोळ्यांनी घेतलेली दिसते.

अगदी पूर्वी खडूने रांगोळी काढली जायची. त्यानंतर ठिपक्यांची रांगोळी आली. दक्षिणेकडे फुलांच्या रांगोळीला महत्त्व आलं. मात्र त्यानंतर स्टीकर आणि आता अ‍ॅक्रेलिकच्या कुंदन, आरसे यांनी तयार केलेल्या रांगोळ्यांना अधिक पसंती मिळू लागली आहे.

मात्र ज्यांना रंग आणि रांगोळ्यांनी काढलेली रांगोळी काढायची असते त्यांच्यासाठी चाळणीच्या रेडीमेड डिझाईन्सच्या रांगोळ्याही उपलब्ध आहेत. अशा रांगोळीच्या प्रकारांविषयी जाणून घेऊ या.

खडू

खडूची रांगोळी हा रांगोळीचा अतिशय जुना प्रकार आहे. पूर्वीच्या बायका घरी येणा-या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा पूजा किंवा गौरी- गणपतीसारख्या सणांसाठी काढायच्या. देवदेवतांच्या समोर अशा प्रकारची रांगोळी काढली जायची. बहुतेक वेळा यात पारंपरिक चिन्हांचा वापर केलेला असतो.

ठिपक्यांची रांगोळी

हादेखील रांगोळीचा अतिशय पारंपरिक प्रकार आहे. गोल, चौकोन, रेषा,चांदण्या काढून हे ठिपके जोडले जातात आणि त्यातून रांगोळीची डिझाईन तयार केली जाते. त्यानंतर यात रंग भरले जातात. मोठमोठया ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप छान दिसतात.

फ्री हँड रांगोळी

आजकाल रांगोळीच्या प्रकारांमध्ये प्रचलित होणारा हा प्रकार आहे. तुम्हाला हवं ते चित्रं तुम्ही यात काढू शकता. अगदी मोर, फुलं, पानं, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र असं यात काढू शकता.

फुलांची रांगोळी

फुलांची रांगोळी प्रामुख्याने दक्षिणेकडे काढली जाते. यात विविध फुलांच्या पाकळ्यांचा आणि पानांचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने गुलाब, अस्टर, झेंडू, निशिगंध, कमळ आदी फुलांच्या पाकळ्या वापरल्या तरीही चालतात. अगदी मोगरा, जाई-जुईचादेखील वापर केला जातो. केरळमध्ये ओणमच्या दिवशी अशाच प्रकारची रांगोळी काढली जाते.

अल्पना

हा बंगालचा पारंपरिक रांगोळीचा प्रकार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी पाण्यात कालवलेल्या तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. या रांगोळीचं वैशिष्टय़ म्हणजे ही रांगोळी केवळ तीन बोटांनीच काढली जाते. रांगोळीचा हा प्रकार बंगालमध्ये दुर्गा पूजेमध्ये आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीदेवीचं स्वागत करण्यासाठी पाहायला मिळतो.

मांडणा

हादेखील रांगोळीचा प्रकार असून प्रामुख्याने राजस्थान येथे पाहायला मिळतो. यात चुन्याच्या पेस्टचा वापर केला जातो. या पेस्टमध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याच्या साहाय्याने रांगोळी काढली जाते. घराच्या भिंतीवर, जमिनीवर ही काढली जाते.

चुन्याबरोबर गेरूच्या पेस्टचा वापर करूनही ही रांगोळी दोन रंगांमध्ये काढली जाते. सणासुदीच्या दिवशी गेरू सारवून त्यावर चुन्याच्या पेस्टच्या साहाय्याने ही काढली जाते.

लाकडी रांगोळी

ही रांगोळी रेडिमेड स्वरूपाचीच असते. त्यात फुलांचे, पानांचे, पक्ष्यांचे आकार तयार असतात. फक्त ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला रचायचे असतात. त्यावर आरसे आणि कुंदन, रंगीत मणी आदींनी सजवलेली असते.

तरंगणारी रांगोळी

तरंगणारी रांगोळी म्हणजे पाण्यावरची रांगोळी. एका बाऊलमध्ये किंवा पसरट भांडयात पाणी घ्यावं. हे भांडं काचेचं असल्यास अधिक चांगलं दिसतं. जिथे ठेवायचं असेल त्या ठिकाणी हे बाऊल ठेवावे. त्यावर हलक्या हाताने कोळशाची पावडर पसरावी. मग त्यावर फुलांच्या किंवा रंगांच्या साहाय्याने रांगोळी काढू शकता. आजकाल यासाठी वॉटर कलरचाही वापर केला जातो.

स्टीकरची रांगोळी

बाजारात सहज फेरफटका मारलात तर तुम्हाला गोल, चौकोन, त्रिकोण, आयताकार अशा विविध आकारातल्या स्टीकरच्या रांगोळ्या दिसतात. या केवळ आणून तुम्हाला चिकटवायच्या असतात. मात्र या रांगोळ्या कायमस्वरूपी राहातात. त्यामुळे त्यांचा वापर कमी झाला आहे.

चाळणीची रांगोळी

सध्या बाजारात चाळणीवर तुम्हाला रेडिमेड डिझाईन असलेल्या चाळण्या मिळतात. त्या तुम्ही हव्या त्या आकारात घेऊ शकतात. लहान, मोठी, चौकोनी, असे विविध आकार यात उपलब्ध असतात. यात केवळ चाळणी ठेवून विविध रंग केवळ डिझाईनवर घालायचे असतात. ह्याचं वैशिष्टय़ म्हणजे ही काढायला अगदीच पाच मिनिटे लागतात.

संस्कार भारतीची..

पाच बोटांच्या साहाय्याने काढली जाणारी आणि पटकन होणारी रांगोळी म्हणून रांगोळीचा हा प्रकार चांगलाच प्रचलित आहे. यात रांगोळी न घातलेल्या रंगांचा वापर केला जातो आणि गोपद्म, कमळ, चक्र, तुरा, शंख अशा चिन्हांच्या साहाय्याने ही रांगोळी काढली जाते.

धान्याची रांगोळी

फुलांप्रमाणेच धान्याचा वापर करून ही रांगोळी काढली जाते. आपल्याला हवी असलेली नक्षी काढून त्यात फुलं किंवा रंगांऐवजी विविध रंगांच्या धान्याचा वापर करावा. यात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी किंवा कडधान्यांचा समावेश करू शकतात.

विविध राज्यांतील दिवाळी

$
0
0
diwali

दिवाळी हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात साजरा केला जातो. दिव्यांची रोषणाई, दारापुढची रांगोळी या गोष्टी जरी सगळीकडे सारख्याच असल्या तरी थोडया फार फरकाने ठिकठिकाणची दिवाळी साजरी करण्याची पद्धत निराळी आहे. भारतातल्या अशा काही राज्यांमध्ये दिवाळी कशी साजरी करतात हे जाणून घेऊया.

diwalidiwaliभारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असं आपल्या देशाचं वर्णन केलं जातं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला वैविध्य पाहायला मिळतं. मग ते सण असो किंवा आणखी काही.

अठवडयाभरावर येऊन ठेपलेली दिवाळीदेखील विविध कारणांसाठी आणि विविध प्रकारे साजरी केली जाते. मात्र सर्वत्र सण सारखाच साजरा केला जातो. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा सण समजला जातो. त्यामुळे सर्वत्र दिव्याची रोषणाई करूनच हा सण साजरा केला जात असणार यात काही शंका नाही.

दिवाळी हा सण जुन्या आणि नव्या विचारांचा संगम आहे, असं म्हटलं तरी चालेल. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. मात्र त्यात वैविध्य आढळतं. दिवाळी किंवा दीपावली हा सण तीन ते पाच दिवस असल्याने लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो.

दिवाळी हा एकमेव सण असतो जेव्हा लोकं एकमेकांच्या अधिक जवळ येतात. कुटुंब एकत्र येतात. गोडधोड-आनंदाच्या बातम्या एकमेकांसोबत शेअर केल्या जातात. चला तर मग आपण कोणकोणत्या ठिकाणी दिवाळी कशी साजरी केली जाते ते जाणून घेऊ या.

कर्नाटक

कन्नड लोकांसाठी दीपावलीचा पहिला आणि तिसरा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. नरकासुराचा उपसंहार केल्याचा दिवस म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीचा दिवस महत्त्वाचा समजला जातो.

नरकासुराला मारल्यावर त्याचं अंगाला लागलेलं रक्त काढण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने अंघोळ केली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याची आठवण म्हणून लोक त्या दिवशी तेलाने अंघोळ करतात. यासाठी देवी गंगा पाण्यात आणि देवी लक्ष्मी तेलात अवतरली होती. अशा काही गमतीदार आख्यायिका या रितीरिवाजांच्या मागे सांगितल्या जातात.

या ठिकाणी तिसरा दिवस बली पद्यमी म्हणून ओळखला जातो. घरातल्या स्त्रिया दारापुढे रांगोळ्या काढतात आणि शेणाच्या गोव-या भिंतीवर थापतात. बळीराजाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तुळशीपूजा होईपर्यंत हा उत्सव सुरू असतो.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात पाचही दिवस साजरे केले जातात. वसुबारसेपासूनच दिवाळीला ख-या अर्थाने सुरुवात होते. या दिवशी गायीची पूजा केली जाते. ओवाळलं जातं. आई आणि मुलाचं प्रतीक म्हणून ती संबोधली जाते.

अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवशी दागिन्यांना लक्ष्मीचं रूप म्हणून पूजलं जातं. याशिवाय एकमेकांना गोडधोड देऊन आणि फटाक्यांची आतषबाजी करून हा सण साजरा केला जातो.

ओडिशा

ओडिसामध्ये दिवाळीचा काहीसा वेगळा अर्थ असल्याचं दिसतं. त्यांच्या मते, पितृपंधरवडयातील अमावस्येला पृथ्वीवर पितृगण येतात. दिवाळीत तुम्ही पुन्हा स्वर्गलोकी जातात. म्हणून तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही दिव्यांची रोषणाई करतो.

जगन्नाथाच्या घरी (म्हणजेच पृथ्वीवर) तुम्ही शांततेत नांदला असा. अशी आशा आहे. दिवाळी सण साजरा करण्यामागे असा काहीसा अर्थ आहे. ठिकठिकाणी होणा-या लक्ष्मी आणि काली मातेच्या पूजेमध्ये तर्पण दिलं जातं.

प. बंगाल आणि आसाम

कालीमातेची पूजा केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. बिहारजवळील मिथिला आणि आसाम या ठिकाणी कालीमातेच्या पूजेबरोबरच लक्ष्मी आणि गणेशाचीही पूजा केली जाते.

आंध्र प्रदेश

या ठिकाणी हरिकथा अर्थात कृष्णकथांचं महत्त्व अधिक आहे. कृष्णाची पत्नी सत्यभामा हिने नरकासुराला मारलं असं सांगितलं जातं. म्हणूनच सत्यभामाची मातीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा केली जाते.

बाकी इतर दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणेच या ठिकाणीही दिवाळी साजरी केली जाते. कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली दिसते.

गुजराथ

गुजरातमध्ये पहिला फटाका दिवाळीलाच फुटतो. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते.

धनत्रयोदशीपासूनच दिवाळीला सुरुवात होते. या दिवसाला उत्तरेमध्ये छोटी दिवाळी असं म्हटलं जातं. लक्ष्मीपूजनाला गुजराथी लोकांचं नवीन र्वष सुरू होतं. भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भावांसाठी बहीण प्रार्थना करते.

पंजाब

पंजाबमध्येही इतरांप्रमाणेच दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी ही टिक्का म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर केशराची पेस्ट आणि भात तिलक म्हणून लावते.

आपल्या भावाच्या मागचं सगळं दुष्टचक्र नष्ट व्हावं हा एकमेव हेतू त्यामागे असतो. बाकी घरोघरी रोषणाई केली जाते, घरांपुढे रांगोळ्याही काढल्या जातात. अमृतसरचं सुवर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतं.

दीप मांगल्याचा सण

$
0
0
Diwali-candles

दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्या पेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते. पुराणात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

Diwali-candlesदिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्या पेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते, हे हेमचंद्राने नोंदवले आहे. नील्मत पुराणात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने ‘नागानंद’ नाटकात या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ असे नाव दिले आहे.

अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशकंदील लावतात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केंव्हा सुरू झाली याची नोंद नाही, पण लहान मुलांच्या हौसेचा भाग म्हणून याकडे पाहता येते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा मुलांच्या मनात जागी राहायला मदत होते.

वसुबारस

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ – वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.

घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत, त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून चा-याच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात.

महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठय़ा दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दीपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसाला ‘यमदीपदान’ असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो, असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्ष िदुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास ‘धन्वंतरी जयंती’ असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुिनबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुिनबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काही जणांची समजूत आहे. कडुिनबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

नरक चतुर्दशी

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.

लक्ष्मीपूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.

त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते.

तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला ‘शुभा’ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वहय़ांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. नवीन वहय़ा सुरू करण्यापूर्वी वहय़ांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो.

नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.

तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता हा भाऊबिजेच्या सण आहे. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

आध्यात्मिक अनुभूतीसाठी..

$
0
0
ladakh

प्रत्येक जण आपापल्या आध्यात्मिक शांतीसाठी कुठे ना कुठे जात असतो. केवळ शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळावी हा एकमेव हेतू यामागे असतो. आपण जितकी या पवित्र भूमीची यात्रा करू तितका आपल्याला मुक्तीचा आणि शांततेचा गहिरा अनुभव येत जाईल. अशाच काही आध्यात्मिक ठिकाणांचा आपण विचार करू.

ladakhआध्यात्मिक मार्गाने आपल्या आत्म्याला शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळवून देण्यासाठी हॉटेल्स डॉट कॉम तुमच्यासाठी काही आघाडीची आध्यात्मिक ठिकाणं घेऊन आलं आहे. जिथे गेल्याने तुम्हाला ‘स्व’त्वाची नव्याने ओळख होईल. भारताला मोठं आध्यात्मिक संचित लाभलं आहे.

आपण जितकी या पवित्र भूमीची यात्रा करू तितका आपल्याला मुक्तीचा आणि शांततेचा गहिरा अनुभव येत जाईल. या आध्यात्मिक प्रवासामुळे पर्यटकांना स्वत्वाची नवीन ओळख होते आणि ते आयुष्यातली आव्हानं झेलण्यासाठी त्यांना अधिक माहिती आणि शहाणपण मिळतं. स्वातंत्र्य आणि मुक्ततेची अनुभूती पर्यटकांना मिळावी यासाठी हॉटेल्स डॉट कॉम काही अशी ठिकाणं सुचवत आहे, ज्यांना आवर्जून भेट द्यावी.

हेमिस मॉनेस्ट्री, लडाख

हेमिस हा लडाखमधली सर्वात मोठा आणि श्रीमंत असा मठ आहे. या मठामध्ये अनेक पुरातन मूर्ती, पवित्र थंगका आणि इतर अनेक कलात्मक वस्तू आहेत. पर्यटनाच्या हंगामामध्ये, इथल्या भिख्खूंद्वारे चालवल्या जाणाऱ्या हेमिस आध्यात्मिक कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यावा.
हॉटेल शिफारस : हॉटेल ड्रॅगन, लेह

बसिलिका ऑफ बॉम जिझस, गोवा

भारतातल्या नामवंत चच्रेसपैकी हे एक चर्च आहे. हे चर्च जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. समुद्रकिना-यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये हे चर्च असून ते तब्बल ३०० वर्षे जुनं आहे. बॉम जिझस म्हणजे चांगला जिझस. या चर्चमध्ये सेण्ट फ्रान्सिस झेविअर्स यांचे अवशेष असल्याचं सांगितलं जातं आणि वर्षाच्या ठरावीक काळामध्ये त्यांचा देह भाविकांना दर्शनासाठी खुला केला जातो. या कालावधीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक इथे येतात, ज्यात परदेशी भाविकांचाही समावेश असतो.
हॉटेल शिफारस : हॉटेल पार्क प्राईम, गोवा

मोईनुद्दीन चिश्ती, अजमेर

आध्यात्मिक शांततेसाठी हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे. या दग्र्याला अशा एका मुस्लीम विचारवंताचं नाव देण्यात आलं आहे जो ‘अल्लाचा वालिस’ (संत) मानला जातो. सत्य, योग्य आचरण, शांतता, प्रेम आणि अहिंसा या मूल्यांच्या प्रसारासाठी हा दर्गा जगभरात प्रसिद्ध आहे.
हॉटेल शिफारस : कंट्री इन अ‍ॅण्ड सुट्स बाय, कार्लटन, अजमेर

ऋषीकेश

योगसाधनेचा उगम जिथे झाला ते हे स्थान असून ध्यानधारणा आणि आरामासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे. हिंदुत्वाचे विविध पैलू शिकण्यासाठी लोक इथे येतात. गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे आणि ते उत्तराखंडमधल्या हरिद्वारपासून फार लांब नाही. इथल्या असंख्य आश्रम आणि योग संस्थांमध्ये अनेक लोक ज्ञान आणि शांतता मिळवण्यासाठी येतात.
हॉटेल शिफारस : एल्बी गंगा व्हय़ू, ऋषिकेश

गद्य प्रार्थना

$
0
0
pray

गद्य स्वरूपात रचना असलेल्या अनेक प्रार्थना अस्तित्वात आहेत. त्यातील काही नमुन्यादाखल देत आहोत. ‘हे परमेश्वरा तुझ्या चरणी लीन होऊन मी तुला मनोभावे नमस्कार करत आहे. तू विश्वाचा निर्माता आहेस. हे ईश्वरा मी तुला प्रत्यक्ष पाहिलेले नाही. पण तरीही तू विश्वातील प्रत्येक प्राणिमात्रात आहेस, तसंच घरांघरांत व्यापून राहिलेला आहेस, यावर माझा गूढ विश्वास आहे..’

pray‘आकाशात सूर्य आणि चंद्र उगवून प्रकाश देत आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचे चक्र नियमित सुरू आहे. वारा वाहतो आहे. मी हे सुंदर जग पाहतो आहे. अशा अनेक गोष्टी या तुझ्याच अस्तित्वाचे पुरावे आहेत.’
‘तू प्रकाश आहेस. अज्ञान दूर करणारा आहेस. निर्गुण आहेस, पण सगुणाची अनुभूती देणारा आहेस. करुणाकर आहेस. मला उत्तम सद्गुण दे, विद्या दे. बळ दे. मला माझ्या सत्स्वरूपाची ओळख करून दे..’

‘माणसाने माणसावर प्रेम करण्याची शिकवण तू आम्हाला दिलीस. आई-वडिलांच्या आणि गुरूच्या प्रेमाची आणि कृपेची महती तू आम्हाला दाखवून दिलीस. आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणा-यांचा वापर करण्यास तूच आम्हाला प्रेरणा दिलीस. दीनदुबळ्यांवर प्रेम करून त्यांना मदत करण्यास तूच आम्हाला शिकवलेस. प्राणिमात्रावर दया करण्याची शिकवण तू दिलीस. अशा कृपावंत विश्वविधात्या तुला मी शरण येत आहे..’

‘मला दुर्गुणांपासून दूर देव. तुला आवडणार नाही असं काम न करण्यासाठी मला प्रामाणिक बनव. तुझे नामसंकीर्तन माझ्याकडून नेहमी होवो. समाजातील पददलित आणि गरिबांना मदत करण्याची प्रेरण मला सतत देत जा. मला निर्भयता आणि सेवाबुद्धी दे. उत्तम ज्ञानबुद्धी दे, यशाची प्रेरणा दे..’

‘हे शक्तिशाली परमेश्वरा संपूर्ण विश्वामध्ये सुख-शांती नांदू दे. प्रत्येकाच्या मनातील वाईट विचार दूर होऊ दे. संपूर्ण जग चांगल्या विचारांनी प्रकाशमय होऊ दे..’

‘हे भगवंता, मी नतमस्तक होऊन तुला नमस्कार करीत आहे. तूच माझा मार्गदर्शक आहेस आणि तुझा कृपाशीर्वाद मला कायमच मिळत राहावा, अशी प्रार्थना नम्रपणे करीत आहे. माझ्या या तळमळीच्या प्रार्थनेचा हे दयाधना, स्वीकार कर!’

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी परमेश्वराकडे केलेली एक सुंदर प्रार्थना पुढे देत आहे. विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही. दु:खावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा जगात माझे नुकसान झाले, केवळ फसवणूकच वाटय़ाला आली. तर माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा माझे तारण तू करावेस.

मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही, तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे. एवढीच माझी इच्छा. माझे ओझे हलके करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही,ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा,दु:खाच्या रात्री सारे जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा.
- रवींद्रनाथ टागोर

गुरुद्वादशीचा दिवस कोणता?

$
0
0
nrusimha

प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री नृसिंह भगवान प्रसन्न झाले, त्यांनी एका क्षणात हिरण्यकश्यपूला पकडले, आपल्या मांडीवर आडवे पाडून आपली धारदार नखे त्याच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली आणि हिरण्यकश्यपूचा वध केला..हिरण्यकश्यपूचा पोटात कालकुटासारखे जहाल विष होते, ते विष भगवान नृसिंहाच्या नखांना लागले, असह्य दाह होऊ लागला, कोणत्याही उपायांनी त्यांना स्वस्थता लाभेना, तेव्हा मग लक्ष्मीने औदुंबरा वृक्षाची फळे आणली, मग विष्णूंनी त्या फळात आपली नखे रोवली आणि मग दाह शांत झाला आणि मग विष्णूंनी औदुंबर वृक्षाला वरदान दिले, ते म्हणाले, औदुंबर वृक्ष सदा फळांनी भरलेला असेल, कल्पवृक्ष म्हणून याची पूजा केली जाईल, जी व्यक्ती भक्तीभावाने सेवा करेल सर्व मनोकामना पूर्ण होतील, या वृक्षाच्या सेवेने वंध्येसही पुत्र होतील..हेच वरदान सार्थ करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्व जनतेस या वृक्षाची प्रचिती यावी, ईश्वर रुपाची जाण व्हावी म्हणूनच श्री गुरू परमपूज्य श्रीमद् ‘नृसिंह सरस्वती’ स्वामी या औदुंबर वृक्षातळी वास करतात..

nrusimhaजेव्हा महाराज वाडी क्षेत्री वास्तव्यास होते, तेव्हा रोज मध्यानकाली ‘योगिनी देवता’ येऊन महाराजांची सेवा करत असत, त्या रोज स्वामींना आपल्याबरोबर घेऊन जात, त्यांची पूजाअर्चा करत, त्यांना भिक्षा अर्पण करत. जेव्हा नृसिंह सरस्वतींची बारा वष्रे तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा श्रीगुरूंनी सांगितले, आपण हे स्थान सोडून आता अन्यत्र प्रयाण करणार असे सांगितले, तेव्हा श्री गुरू आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच योगिनी देवतांना सहन होईना, ‘६४ योगिनी’ देवता श्रीगुरूंची प्रार्थना करू लागल्या, आम्हास सोडून जावू नका, तुमच्या येथील वास्तव्यामुळे नित्य दर्शनामुळे आमचे जीवन सुसह्य झाले आहे, तुमच्या जाण्याने येथील स्वर्गीय शोभा नष्ट होणार आहे, येथील पक्षी निघून जातील, सर्व वृक्ष सुकतील, अन्नपूर्णाही या स्थानाचा त्याग करील, तुमच्या या सेवेच्या लाभास, आनंदास आम्ही मुकलो तर आमच्या जीवनास काहीही अर्थ उरणार नाही, तेव्हा कृपा करा आणि हा प्रयाणाचा विचार सोडून द्या.

त्यांच्या प्रेमळ व निष्कपट अंत:करणातून निघालेले हे कारुण्यपूर्ण बोल ऐकून दयावंत श्रीगुरूंचे मन गलबलले, पण तेथून जाणे तर अत्यावश्यक होते. श्रीगुरू चौसष्ठ योगीनीस आश्वासनपूर्वक म्हणाले, ‘‘शांत व्हा, मी तुमच्यापासून दूर गेल्याचे तुम्हाला कधीच जाणवणार नाही. कृष्णा पंचगंगा संगमावरील हा औदुंबर वृक्ष हेच माझे दिव्यस्थान आहे. प्रत्यक्ष या मानव स्वरूपात जरी मी तुम्हाला दिसणार नसलो तरी गुप्तरूपात माझे वास्तव्य यावत् चंद्र दिवाकरौ येथेच असणार आहे, या माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुम्ही पण जलदेवता आहात हे विसरू नका, तुम्ही सुद्धा येथेच राहून माझ्या सोबतीने माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा.. ही अन्नपूर्णा सुद्धा माझ्या आज्ञेने येथेच राहणार आहे,

या संगम क्षेत्रावर व अमरेश्वर परिसरात माझे वास्तव्य जरी गुप्त राहिले तरी माझ्या श्रद्धावान भक्तांस ते नित्य जाणवेल. मी येथून निघून जाताच हा मी जेथे उभा आहे याच ठिकाणी माझी पाऊले माझ्या सश्रद्ध भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी त्यांच्या सद्वासना पूर्ण करण्यासाठी या संसार सागरातून त्याना सुखरूपपणे पैलतीरी पोहोचवण्यासाठी त्यांची वाट पाहत तिष्ठत असलेली आढळतील. सर्व प्रकारच्या दैवी शक्तींनी परिपूर्ण असलेला माझ्यातील देवत्वाचा अंश या ‘पावलात’ सामावलेला आहे, तेव्हा आता यापुढे या माझ्या पावलात तुम्ही मला पाहा, सदाचार संपन्न श्रद्धाळू भक्ताने माझी व औदुंबर वृक्षाची शुचिर्भूत देहाने, मनाने व निष्कपट भावपूर्ण अंत:करणाने सेवा केल्यास माझे सदेह दर्शनही घडेल. या औदुंबर वृक्षातळी माझ्या या पादुका राहणार आहेत.

तुम्ही नित्य येथे येऊन औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घाला. औदुंबराची केलेली सेवा ही माझीच सेवा घडेल. तेव्हा आता विश्वास ठेवा की मी या देहाने येथून जात असलो तरी येथेच आहे. श्रीगुरूंनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृष्णा पंचगंगा संगमावरील (नृसिंहवाडी) औदुंबर वृक्षातळी उमटलेली त्यांची पावले आजही आपले चित्त वेधून घेतात, पहाटेच्या काकड आरती व दुपारी महापूजेच्या वेळी पादुकांचे सुस्पष्ट दर्शन होते.भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार समाप्तीचा दिवस असलेल्या या दिवशी श्री गुरूंनी आपल्या पादुका स्थापन करून गाणगापुरी प्रयाण केले नृसिंहवाडीत पादुका स्थापन केल्या तोच हा ‘गुरुद्वादशी’चा दिवस..

मंदिरं यमराजाची

$
0
0
qharmeshwar1

यम ही आपल्याकडे मृत्यूची देवता म्हटलं जातं. त्यामुळे त्याची काही मंदिरं असतील याची फारशी कोणालाच कल्पना नाही. अशा या यमाची आपल्या भारतात एक दोन नव्हे तर चक्क सात मंदिरं आहेत. ही मंदिरं कुठे आहेत, त्यांचं काय वैशिष्टय़ आहे, या सात मंदिरांची ही माहिती.

qharmeshwar1हिंदू धर्मात तीन दंड नायक आहेत, यमराज, शनिदेव आणि भैरव. यमराजाला ‘मार्कण्डेय पुराण’नुसार दक्षिण दिशेचे ‘दिक्पाल’ आणि ‘मृत्यूची देवता’ म्हणतात. यमराजाचे पुराणात विचित्र विवरण मिळतं. पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे.

यमराज म्हैसची स्वारी करतात आणि त्यांच्या हातात गदा असते. स्कंदपुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते. यमराजाचे मुंशी ‘चित्रगुप्त’ आहे, ज्यांच्या माध्यमाने ते सर्व प्राण्यांचे कर्म आणि चांगल्या-वाईट कर्माचा हिशोब ठेवतात. चित्रगुप्ताची वही ‘अग्रसन्धानी’मध्ये प्रत्येक जीवाच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशोब असतो. स्मृतीनुसार १४ यम मानले गेले आहेत – यम, धर्मराज, मृत्यू, अन्तक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त. आता जाणून घेऊ यमराजांच्या खास मंदिरांबद्दल..

भरमौरचे यम मंदिर

यमराजाचे हे मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे, जे एक भवनाप्रमाणे आहे. असे म्हणतात की, विधाता लिहितो, चित्रगुप्त वाचतो, यमदूत पकडून आणतात आणि यमराज दंड देतात. मान्यता अशी आहे की, येथेच व्यक्तीच्या कर्माचा हिशोब होतो. यमराजाचे नाव धर्मराज म्हणून पडले, कारण धर्मानुसार त्यांना जीवांना दंड देण्याचे कार्य मिळाले होते. हे मंदिर एका घरासारखे दिसते, जेथे एक रिकामी खोली आहे, ज्यात यमराज आपले मुंशी चित्रगुप्तासोबत विराजमान आहेत. या कक्षाला चित्रगुप्त कक्ष म्हटलं जातं.

चित्रगुप्त यमराजाचे सचिव आहेत, जे जीवात्माच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशोब ठेवतात. मान्यतेनुसार कुठल्या प्राणिमात्राचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला पकडून सर्वात आधी या मंदिरात चित्रगुप्तासमोर प्रस्तुत करतात. चित्रगुप्त जीवात्म्याला त्यांच्या कर्माचे पूर्ण वृत्तांत ऐकवतात. त्यानंतर चित्रगुप्तच्या समोरच्या खोलीत आत्म्याला घेऊन जातात. या खोलीला ‘यमराजाची कचेरी’ म्हणतात.

येथे यमराज कर्मानुसार आत्म्याला आपला निर्णय ऐकवतो. असं मानलं जातं की, या मंदिरात चार अदृश्य द्वार आहेत, जे स्वर्ण, रजत, तांबा आणि लोखंडाने बनलेले आहेत. यमराजाचा निर्णय आल्यानंतर यमदूत आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरूड पुराणात पण यमराजाच्या दरबारातील चार दिशांच्या चार दारांचा उल्लेख करण्यात आला आहे.

यमुना-धर्मराज मंदिर विश्राम घाट, मथुरा

हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरेत यमुनेच्या काठावर विश्राम घाटाजवळ स्थित आहे. याला भाऊ-बहिणीचे मंदिर देखील म्हणतात. कारण यमुना आणि यमराज सूर्याचे पुत्री आणि पुत्र होते. या मंदिरात यमुना आणि धर्मराजच्या मूर्त्यां एकत्र लागलेल्या आहेत. अशी पौराणिक मान्यता आहे की, जो भाऊ, भाऊबिजेच्या दिवशी यमुनेत स्नान करून या मंदिराचे दर्शन करतो त्याला यमलोक जाण्यापासून मुक्ती मिळते. याची पुराणात एक कथापण आहे, जी बहीण भाऊबीज अर्थात यम द्वितीयेच्या दिवशी ऐकते.

धर्मराज मंदिर, लक्ष्मण झुला, हृषीकेश

उत्तर प्रदेशातील हृषीकेशमध्ये स्थित यमराजाचे हे मंदिर फारच जुने आहे. येथे गर्भगृहात यमराजाची स्थापित मूर्ती लिहिण्याच्या मुद्रेत विराजित आहे आणि याच्या जवळपास असलेल्या इतर मूर्ती यमदूताच्या मूर्ती मानल्या जातात. पण यमराजच्या डावीकडे एक मूर्ती स्थापित आहे, जी चित्रगुप्ताची मूर्ती आहे.

श्रीऐमा धर्मराज मंदिर

हे मंदिर तमिळनाडूच्या तंजावर जिल्हय़ात स्थित आहे. या मंदिराबद्दल मान्यता अशी आहे की हे हजारो वर्षे जुने मंदिर आहे.

वाराणसीचे धर्मराज मंदिर

काशीत यमराजाशी निगडित पूर्वी कधीही न ऐकलेली माहिती आहे. मीर घाटावर उपस्थित आहे, अनादिकालचे धम्रेश्वर महादेव मंदिर जेथे धर्मराज यमराजाने महादेवाची आराधना केली होती. मान्यता अशी आहे की, यमाला यमराजाची उपाधी येथेच मिळाली होती. धर्मराज युधिष्ठिराने अज्ञातवासादरम्यान येथे धम्रेश्वर महादेवाची पूजा केली होती. मंदिराचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतरणाच्या आधीचा आहे, जो काशी खंडात वर्णित आहे.

थिरुप्पाईन्जीली यम धर्मराज स्वामी मंदिर

हे मंदिर तमिळनाडूच्या थिरुप्पाईन्जीली मनछानाल्लूर, त्रिचीत स्थित आहे.

श्रीचित्रगुप्त आणि यमराज मंदिर कोईम्बतूर

यमराजाचे हे मंदिर तमिळनाडूच्या कोईम्बतूरच्या वेल्लालूर मेन रोडवर सिंगानल्लूरमध्ये स्थित आहे. येथे एक फारच सुंदर झील आहे.


प्रार्थना म्हणजे काय?

$
0
0
pray

प्रार्थना हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जात असल्यामुळे प्रार्थना म्हणजे नेमकं काय हे विशिष्ट शब्दांत सांगणे कठीण आहे. तिचे स्वरूप बदलते असल्यामुळे तिच्या बाबतीत अनेक बदल संभवतात. प्रार्थना ही काही अपवाद सोडता प्रत्येकाच्या जीवनात लहानपणापासून असते. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास प्रार्थना केल्यानंतरच सुरू होतो.

prayप्रार्थनेचा शब्दकोशातील अर्थ आहे-‘काही विशिष्ट कार्यसिद्धीसाठी करण्यात येणारी कोणाची तरी स्तुती, याचना किंवा विनंती’. प्रार्थना हा शब्द प्र+अर्थ या सोपसर्ग धातूपासून बनलेला आहे. त्याचा अर्थ ‘प्रकर्षाने याचना करणे’ असा होतो. प्रार्थना या शब्दाला इंग्रजीमध्ये प्रेअर (prayer)) असे म्हटले जाते. प्रेअर हा शब्द लॅटिन असून तो ‘प्रेकॅरिअस’पासून तयार झाला आहे. प्रेकॅरिअस म्हणजे ‘मन:पूर्वक केलेल्या याचनेपासून प्राप्त केलेला’ असा अर्थ आहे.

मानव जातीच्या आरंभापासून अनेक रूपांत ही प्रार्थना अस्तित्वात आहे. अर्थात प्रार्थनेचे स्वरूप प्राचीन काळापासून आतापर्यंत ब-याच प्रमाणात बदलत आलेले आहे. तसेच तिचे अंतरंग आणि बाहय़रंगही प्रत्येक धर्मात, जाती- पंथात वेगवेगळे असल्याचे दिसून येते.

‘‘माणसाने आपल्या इष्टदेवतेला किंवा अन्य एखाद्या श्रेष्ठ शक्तीला उद्देशून विनम्र भावनेने आणि धार्मिक श्रद्धेने केलेला नि:शब्द किंवा शब्दबद्ध असे स्तवन, उपकार, स्मरण, पश्चात्तापाचे निवेदन किंवा याचना म्हणजे प्रार्थना’’ अशीही प्रार्थनेची व्याख्या केली जाते. तसेच ‘‘ काही विशिष्ट कार्यसिद्धीसाठी करण्यात येणारी ईश्वराची स्तुती किंवा आर्जव म्हणजे प्रार्थना’’ असाही प्रार्थनेचा रूढ अर्थ समजण्यात येतो; पण प्रार्थना म्हणजे केवळ ईश्वराची स्तुती असे समजणे योग्य नव्हे, तर प्रार्थना म्हणजे जे आपले साध्य आहे किंवा जे आपणाला हवे आहे ते प्राप्त करून घेण्याची आपली पात्रता सिद्ध करून घेणे व त्याला यश येण्यासाठी ईश्वराची स्तुती करून त्याला साकडे घालणे ही गोष्ट होय.

आपण ईश्वराची प्रार्थना केल्यावर तो आपल्यावर कृपादृष्टी ठेवील, आपणाला संकटसमयी योग्य मार्ग दाखवील, अशी खात्री भक्ताला वाटत असते. ही खात्री जितकी अधिक श्रद्धायुक्त आणि प्रबळ असेल तितक्या अधिक प्रमाणात प्रार्थनेचा फायदा होऊ शकतो.
काही वेळा प्रार्थना दु:खातून सुरू होते. आपले दु:ख, दैन्य, मानसिक तणाव कसे दूर होतील? अशी कोणती शक्ती आहे, जी आपले दु:ख निवारण करू शकेल? तेव्हा ते शब्द, ते विचार, त्या भावना एका प्रार्थनेचे रूप धारण करतात. मग एक दिवस लक्षात येते, त्याच्यात जे भाव जागृत झाले, हृदयापासून काही शब्द निघाले, तीच प्रार्थना बनते.

कित्येक भक्त आपल्या परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करून आत्मानंदात तल्लीन होऊन जातात. अशा वेळी प्रार्थनेद्वारे ईश्वराला शरण जाणे, त्याच्याकडे आपल्या सुखदु:खांचा पाढा वाचणे, आपल्या चुकांची किंवा घडून गेलेल्या पापाची कबुली देऊन पश्चात्ताप व्यक्त करणे, काही वेळा अशा गोष्टी प्रार्थनेत व्यक्त केल्या जातात. तसेच ईश्वराबद्दल आदर व्यक्त करून त्याचे आभार मानणे, ईश्वस्तवन करणे, ईश्वराच्या माहात्म्याचे वर्णन करणे, त्याला नवस करणे, ईश्वराच्या सान्निध्यात राहता यावे यासाठी त्याची आळवणी क रणे, यासाठीही प्रार्थना केली जाते.

माणसाने प्रार्थना कशी करावी, याला उत्तर प्रत्येक माणसाचे बदलते असले तरी ती पूर्ण विश्वास ठेवून मन:पूर्वक करावी. ईश्वर आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशा लटक्या रागानेही काही भक्त प्रार्थनेच्या स्वरूपात प्रत्यक्ष परमेश्वराकडेच तक्रार करताना दिसतात.
प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असल्याचे मानले जाते. हजारो वर्षापूर्वी ऋषिमुनींनी, साधू- संतांनी ती ओळखली. त्यातूनच अनेक प्रकारचे मंत्र, स्त्रोत आणि प्रार्थना इत्यादी निर्माण केल्या. त्यातून त्यांनी एक शाश्वत जीवनआधार बनलेला परमानंद अनुभवला आणि जगालाही दिला.

प्रार्थना म्हणजे प्रेम आणि ओढीने ईश्वराची वाट पाहणे. प्रार्थनेमुळे ईश्वराबद्दल परम आदराची भावना निर्माण होते. प्रार्थना ही मानवी जीवनात अनिवार्य आहे, असे समजले जाते. जणू ती जीवनशैलीचा एक भाग बनली आहे. ती सर्वत्र आहे. ती मंदिरामध्ये, चर्चमध्ये, चैत्यामध्ये, मशिदीमध्ये इत्यादी सर्व ठिकाणी केली जाते. घरामध्ये, शाळेमध्ये, बागेमध्ये, समूहामध्येही ती केली जाते. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी ती केली जाते, तसेच रुग्णाच्या रोगनिवारण्यासाठीही केली जाते. अगदी मृतात्म्यास सद्गती प्राप्त व्हावी यासाठीसुद्धा प्रार्थना केल्या जातात.

जगातील सर्वच धर्मात, सर्वच देशांत आणि सर्वच भाषेत अनेक उत्तम प्रार्थना आहेत. ब-याच प्रार्थना या स्वरबद्ध आणि तालबद्ध आहेत. खरे तर प्रार्थनेत शब्द, तरंग, स्पंदन यावर अधिक लक्ष न देता पूर्ण समर्पणाला आणि मनाच्या तन्मयतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

ब-याचशा प्रार्थना या पद्यरचनेमध्ये गुंफलेल्या, भावनोत्कट आणि उत्स्फूर्त असतात; परंतु काळाच्या ओघात त्यात बदल होत गेले. काही ठिकाणी त्यात कृत्रिमता, साचेबद्धता आली, तर काही ठिकाणी त्या अधिक काव्यमय, अलंकारिक आणि सुदंर होत गेल्या. ब-याचशा प्रार्थना या शब्दबद्ध असतात आणि त्यामध्ये काही ना काही अर्थ असतो.

काही तरी गर्भितार्थ असतो. अशा प्रार्थना कधी कधी मोठय़ाने उच्चार करून म्हटल्या जातात, तर काही वेळा मनाची उत्तम एकाग्रता साधून, कोणत्याही प्रकारे तोंडातून उच्चार न करता पूर्णपणे समर्पित भावनेने मनोमन केल्या जातात. अशा प्रकार केल्या जाणा-या नि:शब्द प्रार्थना या अधिक प्रभावी मानल्या जातात. अशा प्रार्थना म्हणजे जणू काही हृदयाची हाकच होय. या मनापासून, हृदयापासून केलेल्या प्रार्थनेला स्थळ-काळाचे नियम नसतात. मात्र अशा प्रार्थने वेळी क्षणभर का होईना स्वत:चा पूर्ण विसर पडला पाहिजे.

शिकवण संत गाडगेबाबांची

$
0
0
gadgebaba

संत गाडगे महाराज हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या या शिकवणीविषयी जाणून घेऊ या.

gadgebabaकीर्तन १

बाबा :- देव किती?
श्रोते :- एक.
बाबा :- तुमच्या गावी खंडोबा आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- दोन
बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग आता देव किती झाले?
श्रोते :- तीन
बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- चार
बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंडय़ाला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

कीर्तन २

बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड?
श्रोते :- श्रीखंड
बाबा :- बासुंदी चांगली का बोकड?
श्रोते :- बासुंदी
बाबा :- दूध चांगले का बोकड?
श्रोते :- दूध
बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती-मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तुम्हाला का पावत नाही? एकेका गुजरातीच्या दहा दहा मजली इमारती आहेत, अन् तुम्ही फुटपाथवर झोपता. शेटजीच्या बायकोचे पाच फुटी पातळ पाचशे रुपयांचे, त्यातला परकर तीनशेचा अन् तुमच्या बायकोच्या नऊवारी पातळाची किंमत किती? पाच रुपये अन् पावली.

देवाला बकरे द्यायचे तर त्याच्या देवळात सोडून द्या, त्याच्या पोटात सुरी कशाला खुपसता? तुम्ही त्याचा इकडे मसाला वाटता, अन् यम तिकडे तुमचा मसाला वाटणार.
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

कीर्तन ३

बाबा :- देव कसा आहे? जसं वारं.
वायू असे सकळ ठायी परि त्याचे बिऱ्हाडची नाही।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर आहे घरात, दारात, झाडात जिकडे तिकडे वारं आहे. पण कोणी असं नाही सांगत की रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता. सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही तसा परमेश्वर आहे. अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत. जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी..
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये.. दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ
मग सांगा जत्रेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही पैशाचा नाश खाना खराब आहे.
गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

तुळशीचे लग्न

$
0
0
when_is_tulsi-vivah_in_2014

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुलशी विवाह करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वाची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वत: सेवन करण्याची पद्धत होती.

when_is_tulsi-vivah_in_2014तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की, जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

पुढे, देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडलेल. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.

श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात.

तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.

बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.

प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

तुळशी विवाहाच्या व्रतासंबंधात दंतकथाही ऐकवली जाते. तुलसी विवाहाचे अनेक काल सांगितले आहेत. परंतु बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वाची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वत: सेवन करण्याची पद्धत होती. श्रीविष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात.

विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला ‘प्रबोधोत्सव’ असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. या सुमारास वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात, असे पूर्वी म्हणत.

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे.

‘‘तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान, उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊलींनाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे. ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.

प्रार्थनेचे स्वरूप

$
0
0
pray-for-god

निसर्गाने होणारे आकस्मित बदल त्याच्या आकलनापलीकडचे असतात. वादळे, अतिवृष्टी, महापूर, अवर्षण, भूकंप इत्यादी आपत्तींमागे एखादी किंवा अनेक अदृश्य शक्ती काम करीत असेल असे वेदकालीन मानवाला वाटत असे. निसर्गातील पंचमहाभूतांचा कोप असेल असे वाटत असे.

pray-for-godम्हणूनच निसर्गशक्तीला या पंचमहाभूतांना (आप, तेज, वायू, पृथ्वी व आकाश) म्हणजेच निसर्गशक्तीला प्रसन्न करण्यासाठी त्या वेळी अनेक प्रार्थना रचल्या गेल्या. त्या मंत्रबद्ध करून आळवल्या गेल्या.

साडेचार हजार वर्षापूर्वीच्या ‘ऋग्वेद’ या प्राचीन ग्रंथात अशा प्रकारच्या अनेक प्रार्थना सूक्त आणि ऋच्यांच्या स्वरूपात आढळतात. या प्रार्थनांमध्ये पंचमहाभूतांनाच ईश्वर मानून त्यांची स्तुती केली आहे; पण यामागे त्यांचा अगतिक स्वार्थही स्पष्टपणे दिसून येतो.
वेदकाळातील प्रार्थनेमध्ये मागण्या होत्या, आम्हाला चांगल्या मार्गाने वैभवाकडे न्यावे.

आमच्या शत्रूपासून आणि नैसर्गिक आपत्तीपासून आमचे संरक्षण व्हावे. आमच्या व्याधी, पिडा, संकटे, पापे नष्ट करावीत. आम्हाला विपुल धनधान्य, उत्तम पशुधन प्राप्त व्हावे. पुत्रादी संतान, सुख-समाधान मिळावे. समृद्धी, संपत्ती आणि सुखमय दीर्घ आयुष्य प्राप्त होवो. आमची मने शुभ संकल्प करणारी होवो, आमची मातृ-पितृ, गुरू, आप्तेष्ट आणि समाज यांच्याविषयक ऋणे फेडून टाकता यावीत.. इत्यादी मागण्या असलेल्या प्रार्थना होत्या. या प्रार्थना व्यक्तिगत सुखासाठी आणि सर्व समाजाच्या सुखासाठीही असत.

हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ऋश्चन, मुस्लीम, पारसी, ज्यू इत्यादी सर्वच धर्मात प्रार्थनेला महत्त्वाचे स्थान आहे. सर्व धर्मसंस्थापकांनी तसेच पंथ-सांप्रदाय प्रवर्तकांनी आपल्या संप्रदायात प्रार्थनेचा समावेश केलेला आहे. त्यातून आत्मोन्नती करणे, आत्म्याची ओळख करून घेणे, स्वत:च्या चैतन्याची जाणीव वाढवणे ही उच्च कोटीची ध्येयेही अंतर्भूत असतात.

काही वेळा सर्व प्रयत्न वाया जातात. मानवी उपायांची परिसीमा होऊनही काहीच परिणाम जाणवत नाही किंवा जाणवेल असे वाटत नाही. अशा वेळी ईश्वराच्या नामोच्चारणाने रोग विमोचन होऊ शकते, संकटाचे निवारण होऊ शकते असा विश्वास होतो. व्याधी किंवा संकटे, अडचणी श्रद्धायुक्त अंत:करणाने केलेल्या प्रार्थनेने दूर होऊ शकतात, असे अनेक ऋषी-मुनींचे, संत-महात्म्यांचे मत आहे. श्रद्धेमध्ये अभूतपूर्व ताकद आहे आणि अशी श्रद्धा प्रार्थनेमध्ये अंतर्भूत होते तेव्हा तिची ताकद अनेक पटीने वाढत असते.

प्रार्थनेचा ओघ सुरू असताना एखाद्यासमोर जरी आकस्मितपणे संकट उभे ठाकलेच, तर तो मनुष्य आपोआप स्थितप्रदत्व धारण करून एकचित्त होतो. मनोबल वाढवून समर्थ होतो. आपोआप प्रतीकारात्मक बळ प्राप्त होते. परिपूर्ण मानसिक संतुलनासाठी प्रार्थना हे उत्तम मनोवर्धक औषध आहे.

प्रार्थना हा एक प्रकारे अंतर्मनाशी केलेला संकल्पच असतो. अंतर्मन हे बाह्य मनापेक्षा नऊ पटीने अधिक शक्तिशाली असते, ही गोष्ट दीडशे वर्षापूर्वी डॉ. सिग्मंड फ्रॉईड या थोर मानसशास्त्रज्ञाने सिद्ध केलेली आहे. प्रार्थनेद्वारे केलेला योग्य संकल्प सत्य सृष्टीत उतरवण्यासाठी त्या प्रार्थनेवर, ईश्वरावर आणि स्वत:वरही पूर्ण श्रद्धा हवी.

मनाची पूर्ण एकाग्रता, सतत प्रयत्न आणि जिद्द यांची आवश्यकता आहे. हे सर्व प्रार्थनेत अंतर्भूत झाले, तर आपले संकल्प सत्य सृष्टीत उतरविणे कठीण जाणार नाही, पण ब-याच वेळा असे दिसून येते की, कित्येकांची म्हणावी तशी श्रद्धाच नसते. श्रद्धेचे महत्त्व वर्णन करणारा भगवद् गीतेतील एक श्लोक पुढे देत आहे.

श्रद्धावान लभेत ज्ञानं तत्पर: संयनेन्द्रिय:
नही ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते
स्वल्पमक्यं धर्मस्य त्रायते महतो भयात्
सा विद्या या विभुक्त्ये (-भगवद् गीता)

प्रार्थना चांगली असली तरी ती सर्वच जण करतात असे नाही. बहुतेकांना प्रार्थनेचे महत्त्व
कळते. प्रार्थना करणे चांगले आहे हेही सर्वाना समजते. खरे तर प्रार्थना ही गुंतागुंतीची प्रक्रिया मुळीच नाही. सहज-सोपी आणि साधी असते.

आपली प्रार्थना योग्य प्रकारे होत आहे की नाही अशा शंका कित्येक नकारात्मक विचारांच्या माणसांच्या मनात वारंवार सतावत असतात, पण हे योग्य नव्हे. भक्ती, श्रद्धा असणे हे महत्त्वाचे आहे. एखादा सुंदर कार्यक्रम पाहिल्यानंतर किंवा जेवल्यानंतर मिळणारे समाधान, आपणाला नेमक्या शब्दात सांगणे कठीण जाते, त्याचप्रमाणे प्रार्थना योग्य होत आहे की नाही हे देखील नेमक्या शब्दात सांगता येत नाही.

गीताध्यायाचं भाषांतर गीतास्मरण

$
0
0
ccc

भगवद् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा आणि मानवी इतिहासातील ग्रंथांपैकी तत्त्वज्ञानावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे. महाभारत या काव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा आहे.

cccभगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली गीता सर्वानाच परिचयाची आहे. त्यावर आधारित कित्येक मराठी, हिंदी आणि संस्कृत ग्रंथ आले आहेत. मात्र हे ग्रंथ प्रत्येकालाच वाचायला जमतीलच असं नाही. असा हा ग्रंथ सर्वसामान्यांना वाचता यावा म्हणून ह. भ. प. मुकुंद कुळकर्णी यांनी ‘गीतास्मरण’ नावाचा मराठी ग्रंथ वाचकांना दिला आहे. नुकतंच या ग्रंथाचं प्रकाशन झालं असून अतिशय आगळ्या पद्धतीने हा प्रकाशन सोहळा करण्यात आला. ग्रंथदिंडीच्या रूपाने तो व्यासपीठावर आणण्यात आला.

प्रकाशन समारंभाच्या वेळी यातील पहिल्या अध्यायाचे वाचन करण्यात आले, त्यांनतर भारूड, भजन, कीर्तन, वारकऱ्यांचं रिंगण आदी प्रकार मुकुंद कुळकर्णी यांनी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.

हा ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवद् गीता या ग्रंथाचे भाषांतर आहे. मराठीत ओवीबद्ध केलेला असल्यामुळे सर्वसामान्यांना तो वाचायला अतिशय सहज आणि सोपा होणार आहे. या ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे यातील नवव्या अध्यायापासून शेवटच्या १९व्या
अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायात एकेक अशा परमेश्वराच्या दहा अवतारांचे ओवीरूप वर्णनसुद्धा आहे. इतकंच नाही तर प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एक एक मंत्र दिला आहे.

सदर ग्रंथ हा ह. भ. प. मुकुंद कुळकर्णी यांनी लिहिला असून त्यांचा संत साहित्याचा अभ्यास आहे. ते स्वत: कीर्तन, प्रवचन, भारूड, पूजापाठ, याज्ञिकी करतात. ते सर्व प्रकारची वाद्यं वाजवतात. मुळात त्यांना लिखाणाची आवड आहे. या ग्रंथाच्या निर्मितीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मला माझ्या वडिलांनी ह.भ.प. शांताराम कुळकर्णी यांनी भगवद् गीता शिकवली. त्यानंतर त्यावर काहीतरी लिहून काढ असा संदेश त्यांनी दिला.’

मात्र परिस्थितीमुळे मला आधी शक्य झालं नाही. मात्र वडिलांचा संदेश माझ्या मनात सतत रुंजी घालत होता. मला या ग्रंथासाठी प्रकाशक दिनेश तांबे यांनी मोलाची मदत केली म्हणून हा गंथ शक्य झाला’. म्हणून त्यांनी गीतेच्या ओवी मराठीत रचल्या आहेत. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात एकोणिसावा अध्याय असून त्यात मुकुंद कुळकर्णी यांची माहिती कळते.

ज्ञानेश्वरांचे विचार

$
0
0
SANT DNYANESHWAR 4

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार

SANT DNYANESHWAR 4»  माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आई-वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.

»  मी स्त्री व्हावे की पुरुष, काळा की गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.

»  माझ्या आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.

»  सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.

»  माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणा-या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदू भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.

»  माझ्या आयुष्यात घडणा-या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.

»  हे विश्व मी निर्माण केलेले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही.

सूर्याला ‘अर्घ्य’ का वाहतात?

$
0
0
sun

शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच ‘अर्घ्य’ म्हटले जाते. सूर्यकिरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.

sunशास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समíपत केले जाते. त्यालाच ‘अर्घ्य’ म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे. सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्यकिरणे परत येत नाहीत.

आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांची बुब्बळं काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणा-या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.

सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ उष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशी सुद्धा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की, सूर्यकिरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अद्भुत रोगनाशक शक्ती आहे.

सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्यकिरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणू नाश करतो. टीबीचे विषाणू उकळणा-या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरित नष्ट होतात. यावरूनच सूर्यकिरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुद्ध हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रिय होते.

सूर्यकिरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते, त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.

‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुष’ (यजुर्वेद ७/४२) या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थाचा आत्मा समजले जाते. जीवेत शरद: शतम् (यजुर्वेद ३६/२४) पासून शंभर र्वष जगण्याची, शंभर र्वष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थनासुद्धा सूर्यालाच केली जाते.

एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, सूर्यापासून मिळणारी ऊब आमच्यात सुरक्षित राहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही ऊब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ उष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुद्धा आहे.

वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नसíगक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने आवश्यक आहे.


त्रिमूर्ती श्रीदत्त

$
0
0
lorddatta

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

lorddattaपूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठय़ा प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीचे महत्त्व

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते.

जन्मोत्सव साजरा करणे

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाहीत. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात.

दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवडय़ाचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे
प्रतीक आहे.

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते व त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.

चौल येथील पर्वतवासी श्री दत्तमंदिर

$
0
0
lorddatta

अलिबाग तालुक्यातील चौल हे गाव मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे रामेश्वर, शीतळादेवी, हिंगुळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, कुंडेश्वर आदी मंदिरे आहेत . त्यापैकी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान एक आहे. येथे दत्त जयंतीपासून पाच दिवस यात्रा असते. यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

lorddattaअलिबागपासून १६ कि.मी. अंतरावर तर चौल नाक्यावरून २ कि.मी. अंतरावर भोवाळे या निसर्गरम्य गावातील टेकडीवर हे दत्तमंदिर आहे. सुमारे सातशे पाय-या चढून गेल्यावर दत्ताचे दर्शन घेता येते. साधारण पाचशे पाय-या चढून गेल्यावर डाव्या हाताला एक लहानसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे.

पुढे साधारण पंचवीस तीस पाय-या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर विश्रारांती स्थान म्हणून सद्गुरू बुरांडे महाराज समाधी पाहावयास मिळते. पुढे सुमारे दीडशे पाय-यानंतर सत्वित आनंद साधना कुटी आहे. त्यापुढे हरे राम विश्रामधाम त्यानंतर हरे राम बाबांचे धुनीमंदिर त्यापुढे औदुंबर मठ पाहावयास मिळतो. इथपर्यत आल्यानंतर आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या दत्तमंदिराच्या दर्शनाने मन प्रसन्न होते.

श्री दत्त मंदिराच्या पाठीमागे म्हणजे पश्चिमेला चौल व रेवदंडा, अलिबाग तालुक्यास जोडणारा रेवदंडा पूल, कोर्लईचा किल्ला, कुंडलिका खाडी, श्री दत्त मंदिराचे दक्षिणेला खाली उतरले की लगेचच माई जानकीबाई हनुमानदास मठ लागतो.

ही जानकीबाई नावाच्या माई मठी आहे. या मठीत राम-लक्ष्मणाची जुनी मूर्ती आहे. त्यांनतर मठीचा जीर्णोद्धार कृष्णदासबाबांनी केला. सध्या मठात ब-याच मूर्ती पाहावयास मिळतात. येथून पायवाटेने खाली उतरले की हिंगुळजा देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. हिंगुळजा देवीच्या मंदिराला लागूनच अन्नपूर्णा देवीचे आत गुंफेत स्थान आहे.

इ.स. १८१०च्या मार्च-एप्रिलमध्ये डोंगरावर एक गोसावी राहात होता. त्याने तिथे एक मठी बांधली. हा गोवावी दत्ताची भक्ती करीत असे. एक दिवस त्याने दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून काढून त्या आपल्या मठीत आणल्या आणि पुरून ठेवल्या. पुढे १८३१ मार्च-एप्रिलमध्ये एक पाषाणाची दीपमाळा बांधण्यात आली. १८३४च्या डिसेंबरमध्ये गोविंद वाडकर नावाच्या रेवदंडय़ाच्या कोळी गृहस्थाने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणेची साधी असलेली वाट चुनेगच्चीची केली. तर वर कळस बांधला.

१८४३मध्ये गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी भिक्षा मागून पैसे जमविले आणि मठीचा जीर्णोद्धार केला. त्यावर कौलारू मंडप बांधला. या ठिकाणी एक फिरता बैरागी वस्तीस आला. त्याने १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये दत्ताची एक पाषाण मूर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली. सन १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला.

दरवर्षी दत्तजयंतीपासून पाच दिवस दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या पाच दिवसांत फार मोठी जत्रा भरते. यात्रेच्या पहिल्या दिवशी या नगरीतील पाझरे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणा-या मंडळींनी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत तो दत्त मंदिरात आणला जातो आणि मूळ दत्तमूर्तीची यथासांग पूजा करून हा मुखवटा मूळ दत्तमूर्तीला लावतात. यात्रेपूर्वी या श्री दत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो.

देवपूजा

$
0
0
devpuja

रेडिओवरची गाणी ऐकता ऐकता माझ्या पोळ्या सुरू होत्या आणि त्याचबरोबर एकीकडे डोक्यात विचारही. पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र उभं राहिलं.

devpujaभल्या पहाटेच उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगरे कामात गर्क आहेत.

सकाळची सर्व आन्हिकं उरकून, शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.

फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध उगाळतात.

तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. ख-या भक्तिभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना ‘तो’ आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, ‘तो’ समर्थ आहे, मी कशाला उगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.

चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धुपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफील. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.

तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समíपत व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं. खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्त्विक बनवणारी.

तुम्हाला जास्त प्रेमळ, करुणामय आणि क्षमाशील बनवून आत्मविश्वास प्रदान करणारी. ‘मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही उत्तमच होईल’ असा भक्कम विश्वास देऊ करणारी. हळूहळू तुमच्यातला ‘अहं’ विसरायला लावणारी. अशी ही रोजची देवपूजा.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान मोलाचे

$
0
0
varkari

संत साहित्यातून आपल्याला सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि विश्वबंधुत्वाची शिकवण मिळत असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संतांचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप यांनी केले. शोषणमुक्त समाज निर्मितीचे स्वप्न संत विचारांच्या प्रसारातूनच होऊ शकते, असा विश्वास घुमान येथील एस. एम्. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि मुंबईच्या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरातील तरुण कीर्तनकार आणि पुरोगामी चळवळीतील निवडक ५० पेक्षा जास्त जणांचे दोन दिवसांचे वैचारिक मंथन नुकतेच झाले.

varkari‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी चळवळीचे योगदान’ असा या शिबिराचा विषय होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ अभ्यासक आणि घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक, ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे-शास्त्री, एस एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे सुभाष वारे, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर, राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम यानी या विषयाचे पैलू उलगडून दाखविले. ‘ज्ञानदेवे रचिलापाया। तुका झाला से कळस?’ या अभंगावर श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे कीर्तन झाले. त्यांनी वारकरी चळवळीचा इतिहास कीर्तनातून अलगदपणे उलगडून दाखविला.

फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र,समता, बंधुता ही मूल्ये दिली तर सातशे वर्षापूर्वी वारकरी संतांनी स्वातंत्र, समता, बंधुभाव, स्त्रीसक्षमीकरण हा विचार मांडला. संत जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई अशा महिलांनी वारकरी चळवळीचे नेतृत्व केले, असे विचार शामसुंदर महाराजांनी कीर्तनातून मांडले. तर समाजात बदल घडताना मूळच्या क्रांतिकारी विचारांवर चढलेली पुटे पुन्हा पुन्हा तपासावी लागतात असे मत विद्रोही कीर्तनकार पांडुरंग शितोळे यांनी व्यक्त केले. संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे केवळ भाषांतर केले नाही, तर त्यावर भाष्य केले आहे. गीता दुष्टांचा संहार करायला सांगते, तर संत ज्ञानेश्वर पसायदानातून खळांची वेंगटी सांडो, असे मागणे विश्वात्मक देवाकडे मागतात,असे मत राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केले.

वारकरी चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडताना सदानंद मोरे यांनी चळवळीने सुरू केलेल्या सामाजिक सुधारणांचे मूलगामी विशेषण याप्रसंगी मांडले. संत साहित्यातून प्रसृत झालेली मूल्यव्यवस्था ही मानवतावादी आणि जन्माधिष्ठित उच्चनिचता नाकारणारी होती, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी याप्रसंगी केले.

पंढरीच्या वारीत पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यानी माळशिरस ते खुडूस फाटा हे अंतर माऊलीच्या दिंडीसोबत चालून कीर्तनकार आणि कार्यकत्रे यांच्यातील संवादाची सुरुवात या पूर्वीच सुरू केली आहे. या शिबिराद्वारे तो संवाद पुढे जातोय, असे मत एस. एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे सुभाष वारे यांनी व्यक्त केले. शरद कदम यांच्या संकल्पनेतून हे शिबीर साकारले.

प्रार्थनेचे प्रकार

$
0
0
pray

प्रार्थना ही जगात सगळीकडेच असल्यामुळे तिचे प्रकारही असंख्य आहेत. त्याचप्रमाणे प्रार्थना करण्याचे हेतूही वेगवेगळे असतात. प्रार्थना ही बहुतेक वेळा शब्दयुक्त असते आणि अर्थबद्ध असते. प्रार्थना करीत असताना त्यातून स्पंदने उत्पन्न होत असतात.

prayकाही लोक प्रार्थनेला चांगली चाल देऊन संगीताच्या साथीने गोड गळ्याने गातात, तर काही लोक प्रार्थना मोठमोठय़ाने म्हणतात आणि ते आपल्या कानांनी लक्षपूर्वक ऐकतात. काही मंडळी प्रार्थना करता करता आपल्या परमेश्वराची मूर्ती मनासमोर आणून त्याच्या चरणापासून मस्तकापर्यंत पुन:पुन्हा पाहत राहतात.

कधी कधी याच अवस्थेत आपल्या ईश्वराची मानसपूजा करतात. काही माणसे बेंबीच्या देठापासून जोराने वैखरी वाणीमध्ये देवाला हाक मारून प्रार्थना करताना दिसतात. या प्रार्थनेला मौखिक प्रार्थना म्हणतात. अशा प्रकारच्या प्रार्थना, स्त्रोत्रे, ोक, स्तवने, नामावल्या अनेक धर्म ग्रंथांत आढळतात.

काही मंडळी प्रार्थना करण्यापूर्वी प्राणायम करतात. त्यामुळे श्वास आणि उच्छ्वास यांची गती प्राणायमाने तालबद्ध अशी सुरू होते. साहजिकच प्रार्थनेमध्ये मन अधिकच एकाग्र होते. काही साधक कोणत्याही प्रकारे अवडंबर न माजविता मनातल्या मनात प्रार्थना करतात. काही लोक प्रार्थनेमध्ये स्वत:चा विचारच करीत नाहीत.

केवळ विश्वाच्या कल्याणाचा विचार मनात असतो. रेसा विश्व माझ्यात सामावले आहे आणि मी या सा-या विश्वात आहे, अशी विश्वतादात्म्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली असते. अर्थात असा उदात्त विचार करणारी फारच थोडी मंडळी असतात आणि बहुधा ती संतपदाला पोहोचलेली असतात.

प्रार्थना ही सकाम किंवा निष्काम अशी असू शकते. सकाम याचा अर्थ स्वत:च्या किंवा इतरांच्या फायद्यासाठी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेली प्रार्थना. सर्वसामान्य माणसांच्या प्रार्थना या सकामच असतात, तर निष्काम प्रार्थना या स्वत:च्या फायद्यासाठी केलेल्या नसतात. की इतरांच्या फायद्यासाठी ही केलेल्या नसतात. अशा प्रार्थनेमध्ये काहीच हेतू नसतो. केवळ ईश्वराचे गुणगान या प्रार्थनेमध्ये मनापासून केलेले असते.

अनेक साधुसंतांचे बरेचसे अभंग या निष्काम प्रार्थनाच असल्याचे दिसून येते. अशा निष्काम प्रार्थनेने मानसिक उन्नती होऊन आध्यात्मिक पातळी वाढते, असे दिसून आलेले आहे.

मौन प्रार्थना हाही एक प्रार्थनेचा प्रकार आहे. विशेषत: ध्यानधारणा करताना मौन प्रार्थना केली जाते. अशा प्रार्थनेने आपण आपल्यातच असलेल्या शांतीमध्ये प्रवेश करतो. या प्रार्थनात सुधारक आपले देहभान, संवेदना सर्व काही विसरून ईश्वराशी तादात्म्य पावतो. या प्रार्थनेमुळे साधकाला नवचैतन्य, नवीन शक्ती आणि आत्मानंद लाभतो. मन ताजे, टवटवीत होते.

त्रुषी मुनी, धर्मवेते, संतमहात्मे यांनी नेहमीच मौन प्रार्थनावर भर दिलेला होता. या प्रार्थनेच्या प्रकाराला मानस प्रार्थना असेही म्हणतात. मात्र ही प्रार्थना करण्यासाठी साधकाने आपल्या मनाला इकडे तिकडे न भटकता ईश्वराकडे केंद्रित करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.

थोर शास्त्रज्ञ ‘प्लेटो’ची एक अत्यंत आवडती प्रार्थना आहे. ‘हे प्रभू, मी जरी मागितल्या नाही तरी चांगल्या गोष्टी मला दे आणि जरी मी मागितल्या असल्या तरी वाईट गोष्टींपासून मला दूर ठेव’ प्रार्थनेबाबत अनेकांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणचा मार्ग सांगितला. महात्मा गांधींनी सामुदायिक प्रार्थनेतून सत्य, शहिंसा, सहिष्णुता, बंधुभाव, सर्व धर्मसमभाव जागृत केला. महर्षी विनोबा भावे यांनी मौन प्रार्थनेत आण्विक सामर्थ्य असल्याचे सांगितले आहे.

चांगल्या विचारांचे प्रक्षेपण करणारी प्रार्थना श्रेष्ठ समजली पाहिजे, पण ती मनापासून एकरूप होऊन समर्पित भावनेने करावयास हवी. त्यावेळी अवस्था शक्यतो अशी असावी की, मनातील सर्व विचार काही काळ स्तब्ध झालेले हवेत. मन एका नि:शब्द, शांत स्थितीत हवे. अशा वेळी प्रार्थनेत आपोआप तल्लीनता येते.

काही महान संत – महात्मे म्हणतात- ‘परमेश्वराची प्रार्थना करताना कोण्याही फळाची अपेक्षा धरू नका. कोणतीही इच्छा न करता निरपेक्ष भावनेने आणि नि:स्वार्थी मनाने तळमळीने केलेली प्रार्थना अधिक परिणामकारक ठरते. त्यातूनच ईश्वराच्या अधिक जवळ जाता येते.’

Viewing all 1081 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>