
समुद्रसपाटीपासून ३३४२ फूट उंचीवर वसलेल्या शिवनेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाठावे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुर्गमित्रांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे.
समुद्रसपाटीपासून ३३४२ फूट उंचीवर वसलेल्या शिवनेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाठावे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुर्गमित्रांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे. शिवनेरी किल्ल्याच्या दुर्गअवशेषांत प्रवेशद्वारे शरभ शिल्प, शिवाई मंदिर, अंबरखाना इमारत, गंगा-जमुना पाण्याची टाकी, शिवकुंज वास्तू, कमानी मशीद, शिवजन्म स्थान वास्तू, कडेलोट स्थान, बदामी तलाव, कोळी चौथरा इ.समावेश होतो.
शिवनेरी किल्ल्यांवरील विविध कालखंडात उभारण्यात आलेली सात प्रवेशद्वारे अभ्यासकांना संशोधनास आव्हान आहे. गडफेरी करण्यास ३ तास पुरेसे आहेत. जुन्नरपासून २ कि.मी. अंतरावर शिवनेरी आहे. शिवनेरीवर जाण्यासाठी दुर्गयात्रींना राजमार्ग व साखळीची वाट असे दोन पर्याय आहेत.
गडावरील शिवाई देवी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन विभाग असून मंडपात दोन रांगांत पाच लाकडी खांब आहेत. गाभा ‘यातील शिवाई देवीची चतुर्भुज मूर्ती लक्षवेधक आहे. राजमाता जिजाऊंनी याच देवीला नवस केला होता. दासायन लेखातील रामदासी यांनी दिलेल्या संदर्भानुसार जिजाऊने मनोभावे या देवीची प्रार्थना केली आणि स्वराज्याच्या संकटकाळात व जडणघडणीच्या वाटचालीत रक्षण करण्याबाबत तिची डोळयांत पाणी आणून विनवणी केली.
देवीने प्रकट स्वरूपात जिजाऊंच्या अंगात संचार करून ’प्रत्यक्ष सांबसदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तोच तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे’ असा आशीर्वाद दिला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. देवीच्या नावावरूनच ‘शिवाजी’ हे नाव ठेवण्यात आले.
शिवनेरीच्या प्रदीर्घ इतिहासाची आदिशक्ती शिवाई देवी ही कोरीव लेण्यात स्वयंभू आहे, असे मानतात. सन १९४७ साली कुसुर ग्रामवासीयांनी जी देवीची मूर्ती तयार करून बसवून घेतली ती चतुर्भुज सिहंवाहन, हाती गदा, तलवार, आयुधे असून दोन बाजूंना महिषासुराच्या मूर्ती आहेत. मूर्तीची उंची सुमारे ३.१५ फूट असून मूर्तीचे तेज मन प्रसन्न करते.
इ.स. १६५० मध्ये कोळ्यांनी मोगलांविरुद्ध बंड केले. मोगलांनी ते बंड मोडताना शिवनेरीवर सर्वोच्च ठिकाणी बंड करणा-या कोळयांची मुंडकी उडवली. ऑक्टोबर १६७० मध्ये मोरोपंत पेशव्यांनी शिवनेरी जिंकण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. एप्रिल १६७२ मध्येही शिवनेरी माळा लावून जिंकण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. इ.स.१७५६ मध्ये पेशव्यांनी शिवनेरी घेतला.
इ.स. १६३६ ते १७५६ या संपूर्ण कालखंडात शिवनेरी मोगलांच्या ताब्यात होता. शिवनेरी चावंड, हडसर जीवधन हरिश्चंद्र व त्या खालील प्रदेशांचा नवा तालुका करून त्याचे पहिले सुभेदार म्हणून उद्धव वीरेवर चितळेंना नेमण्यात आले.
इ.स. १७९३ मध्ये जुन्नरच्या गढीत २ र्वष अटकेत असताना दुस-या बाजीराव पेशव्यांनी गडदेवता शिवाई देवीला बहीण मानून भाऊबिजेला साडी-चोळी पाठविली. २० मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने शिवनेरी व दुस-या दिवशी जुन्नरची गढी जिंकली. इ.स. २००६ मध्ये शिवनेरी किल्ला पर्यटन क्षेत्र घोषित करून महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे.
सध्या पुरातत्त्व विभागाने गडावर बरेच काम केलेले दिसते. शिवनेरीहून लेण्याद्री मानमोडी डोंगररांग नारायणगड ढाकोबा जीवधन हडसर हरिश्चंद्रगड परिसर दिसतो. जुन्नर नाणेघाट हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी चावंड हडसर जीवधन शिवनेरी या दुर्गाची निर्मिती झाली. शिवनेरी परिसरातील लेण्यांतील शिलालेख महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साधने आहेत.
गायत्री मंत्राची फलप्राप्ती
गायत्री मंत्राच्या फलप्राप्तीसाठी सूर्यध्यान करून योग्य पद्धतीने साधना करावी लागते. दररोज दहा वेळा किंवा बारा वेळा किंवा एकशेआठ वेळा गायत्री मंत्राचा जप मनोभावे करावा, असे ग्रंथात सांगितले आहे.
गायत्री मंत्राच्या सव्वा लाख जपाला अनुष्ठान म्हणतात. हे अनुष्ठान केव्हाही करावे; पण पंचमी, एकादशी व पौर्णिमा या शुभतिथी मानल्या गेल्या आहेत. अनुष्ठानासाठी वद्यपक्षापेक्षा शुक्लपक्ष अधिक श्रेयस्कर मानला जातो. मात्र गायत्री मंत्राचा जप यथार्थ रीतीने व्हायला हवा.
मंत्राच्या उच्चारणाला खूप महत्त्व असे. मंत्रातील प्रत्येक अक्षराचा उच्चार कसा करायचा याचे शास्त्र आहे. ध्वनी किती बरोबर उमटतो, याला महत्त्व आहे. तो विशिष्ट लयीत आणि विशिष्ट सुरात उच्चारायला हवा. तरच त्यातून विलक्षण नादमाधुर्य स्र्वू लागेल. मंत्रातील सर्व शब्दांचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध हवा आणि त्याचा अर्थही नीट समजून घ्यायला हवा.
म्हणूनच कोणताही मंत्री योग्य जाणकार गुरूकडून शिकून घेतला पाहिजे. गायत्री मंत्राची उपासना करणा-या साधकाची सदसद्विवेकबुद्धी जागृत हवी. त्याने असत्याने कुटिल वागून चालणार नाही. गायत्री मंत्राची उपासना करणा-या व्यक्तीची एकंदर प्रवृत्ती वाईट असली तर उपासना निष्फळ ठरते. शिवाय योग्य गुरू वाचून गायत्री मंत्राची साधना करणे म्हणजे वादळात शिड फाटलेल्या नौकेतून पैलतीरी जाण्याचा आत्मघातकी प्रयत्न करण्यासारखे आहे.
गायत्री मंत्राच्या साधनेने उत्तम गुणसंपदा प्राप्त होते. साधकाची जीभ पातळ होते, त्यामुळे साधकाचे शब्दोच्चार स्पष्ट आणि बिनचूक होतात. मानसिक व शारीरिक बल वाढते. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती विकसित होते. उत्तम आरोग्य लाभून प्रापंचिक आणि पारमार्थिक समृद्धी प्राप्त होते.
गायत्री मंत्राच्या उच्चतम साधनेने साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. त्याच्यातील अनेक सिद्धींची जाणीव त्याला होऊन त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. मानसिक प्रसन्नता आणि शांती कैक पटीने अधिक अनुभवास येते.
सर्व ऋषिमुनींनी, साधुसंतांनी गायत्रीला गौरविलेले आहेच; तसेच आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ जाणकारांनी आणि विचारवंतांनीही गायत्री मंत्राचा गौरव केला आहे.
स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘‘गायत्रीच्या जपाने फार मोठी शक्ती प्राप्त होते. तिची प्रत्यक्ष साधना करूनच तिचा अनुभव घ्यायला हवा.’’ स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘गायत्री हा सद्बुद्धी देणारा मंत्र आहे. सद्बुद्धीने सन्मार्गाचा लाभ होतो आणि सन्मार्गाने जात असताना सत्कर्मेही आपोआप घडतात.’’
लोकमान्य टिळक म्हणतात, ‘श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचे प्रचंड सामर्थ्य गायत्री मंत्रात आहे. गायत्रीच्या साधनेमुळेच सदसद्विवेकबुद्धी प्राप्त होते.’ पंडित मदनमोहन मालवीय म्हणतात, ‘‘ईश्वराविषयी अनन्यनिष्ठा गायत्रीमुळेच निर्माण होते. एवढेच नव्हे, तर भौतिक ऐश्वर्यही गायत्रीमुळे प्राप्त होते.’’
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन गायत्रीचा महिमा सांगताना म्हणतात, ‘‘गायत्री मानवतेला मिळालेली महान देणगी अहे. यथार्थ ज्ञानाचा स्रेत मानवी अंतर्मनात गायत्रीने प्रवाहित होऊ शकेल. इतकेच नव्हे, तर शाश्वत ज्ञानाचे अक्षय्य तेवणारे असंख्य नंदादीप मानवच मानवतेच्या मंदिरात लावू शकेल.’’